Friendship Status Marathi |
Friendship Status Marathi:
Today I am Sharing with you the
Friendship Status Marathiin Marathi Language.Mostly Marathi
People Want One Line Marathi Tomne in Hindi English etc. Marathi
Whatsapp Status in One line in Attitude Love Funny Etc are Given Below.Short
Marathi Status is Unique status you can get it and utilize it on your New
Marathi Whatsapp Status Marathi Stetus Marathi the Best Status accumulation is
Given below.I trust You will Like our Marathi Status for whatsapp Collection.
.
जर काही तरी नाही आवडले तर
सांगायला उशीर करु नकोस.
.
कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउन
बोलायला विसरु नकोस.
.
कधी चुक झाल्यास माफ कर पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.
-------------------------------------------------
कधी डब्बा आणला कि चोरून खातात
आपण मात्र उपाशीच राहतो
मग आपल्याच डब्यातला घास त्यांच्या डब्यातून देतात
घे खा थोडे म्हणत
आपल्या पाठीवर हात ठेवतात
खरेच मित्र हे कमालच असतात
मित्र हे असेच असतात ....
-------------------------------------------------
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती ........
-------------------------------------------------
ओळख नसते पाळख नसते, असे आपणास
कोणीतरी भेटते.मग एकमेकाँची ओळख पटते.
त्याची-आपली गट्टी जमते.एकमेकांच्य
ा मनातील भाषा कळते. ईकडे-तिकडे मन
वळते. इतकि मग पक्कड बसते. सहज तोडणे
अवघड असते. दूर रहाणे असह्य होते. असे हे
नाते असते. अशीच ही न
तुटणारी जन्मोजन्मीची"मैत्री" असते
-------------------------------------------------
ओळख तुझी माझी
अनोळखी अश्या काव्यात झाली
बोलताना कळलेच नाही
आपली केव्हा मैत्री झाली
अशीच आहेस तू वेडी
मैत्रीची घातलीस तू बेडी
देऊन विश्वास माझ्या मनाला
केलीस तू पुन्हा शब्दांची बोली
-------------------------------------------------
ओलसर मातीवर पाण्याचे ठसे ,
हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे ,
दिवसा मागून दिवस जातात,
उरतात फक्त न विसरू शकणारे
मैत्रीचे किस्से
-------------------------------------------------
ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे....♥♥
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसु
दे.♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला..
परंतु...
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असु
दे
-------------------------------------------------
ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत
नाही,
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,
खऱ्या मैत्रीपूर्ण भावनांचा उल्लेख कधी ''शब्दात'' करता येत नाही.
-------------------------------------------------
एखादी मैंञीची वेल
असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण
त्या वेलीकडे पाहुणी .
मैंञीच्या वेलीला पाण्याची
गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची
जान असावी.
उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .
-------------------------------------------------
एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे...
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे...
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय ...
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजेल ..!
-------------------------------------------------
एके दिवशी मज आठवला
बालपणीचे गाव
सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे
अन काहींचे नाव
-------------------------------------------------
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे...
-------------------------------------------------
एका मुलाने
मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक
प्रेयसीला आणि एक
मित्राला .....
"मी जातोय उत्तर लवकर
द्या !!"
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले," तू
कुठे जातोस? मी कामात आहे,
नंतर भेटू ..."
...... हे वाचून त्याला खूपच दुख
झाल
दुसरे उत्तर मित्राचे आले," अबे
कमीने थांब, एकटा कुठे चाललास,
मी पण येतोय !!!"
हे वाचून
मुलगा हसला आणि बोलला, "
आज पुन्हा एकदा प्रेम
मैत्रीला हरले"
-------------------------------------------------
एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर दिला असता,
माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश
व्हावा म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...
-------------------------------------------------
एकदा तरी आठवण माझी
आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली
नकळत चालावी
-------------------------------------------------
एक सिगारेट दोघात ओढ्तो
इतके नाते अतुट ते
खाद्यावरती हात मैत्रीचा
जिवाला जीव ते
जिवापेक्षा ही अजीज
मित्र मला असे ते
बायको म्हणते नेहीमी
मित्र तुझे उल्हाड ते
-------------------------------------------------
एक मैत्रीण अशी हवी..
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागुन आवज देणारी..
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलिच तर अश्रु
हि पुसणारी..
स्वताच्या घासातला घास
आठवाणीने काढुन ठेवनारी..
वेळ
प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजुत हि काढणारी..
सगळ्यांच्या घोळक्यात
!!..SOMNATH..!!शोधणारी..
आपल्या आठवणीने आपण
नसताना व्याकुळ होणारी..
खरच अशी एक तरी जिवाची
मैत्रीण
असावी आपणाला मित्र
म्हणणारी.
-------------------------------------------------
एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. :)
पण शेवट मात्री रडवून जातो.:(
अशीच असते का हि चांगली मैत्री.
आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी.
-------------------------------------------------
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
-------------------------------------------------
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.
-------------------------------------------------
एक दिवस मन मनाशी
बोलेल,
फक्त शब्दाँचा भास राहिल..!
डोळे माझे पाणावलेले,
तो क्षण अबोल राहिल..!
पुन्हा साँगड घालायची
नाही असा नियतीचा खेळ राहिल..!
पण जिवनभर आठवेल
अशी या मैत्रीची औढ राहिल...!
-------------------------------------------------
एक तरी मैत्रीण असावी,
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा.
तुमचासुद्धा खांदा कधी तरी,
तिच्या दुःखाने भिजावा.
-------------------------------------------------
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...
मी खरचं खुप भाग्यवान आहे कि माझी एक मैत्रीण आहे
अगदी अशीच....
-------------------------------------------------
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
-------------------------------------------------
ऋतू आपली कुस एकदम बदलतो,
अचानक सूर्य ढगाआड
दिसेनासा होतो ,
आभाळ गच्च भरुन येत,
क्षणार्धात पावसाच्या धाराँनी
अंगण भिजून जात्,
मातिलाही सूगंध सुटतो,
मैञीच असेच आहे,
... दिवस भरकन निघुन जातात ,
प्रत्येकाचे मार्ग वेगळे होतात,
तेव्हा एकदम आठवणी
डोळ्यात दाटुन येतात,
हलकेच आसु ओघळतात
मैञीच्या आठवणिचा सुगंध
दरवळुन जातो,
भरुन आलेलं मन शाँतही होतं ,
एखादया पाऊस पडुन गेलेल्या
आभाळा सारखं.
-------------------------------------------------
उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .
फुलावी मैंञीची ही वेल
माझ्या अंगणी , मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.
-------------------------------------------------
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
-------------------------------------------------
आयुष्यात बरीच माणसे भेटतील
आणि दूरवतील देखील,
नाती जुळतात
आणि तुटतात देखील,
शब्द देतात
आणि विसरतात देखील,
पण,
निखळ मैत्री आजन्म टिकून राहते,
तुजया माज़या मैत्री सारखी ...
-------------------------------------------------
आयुष्यात प्रत्येकाने
अनुभवलेली एक गोष्ट
म्हणजे कॉंप्रमाइज़... !
त्यावरच काही ओळी...
आजवर पर्यंत फक्त
कॉंप्रमाइज़ करत आलोय
शाळेत असताना सुट्टी
संपल्याच कॉंप्रमाइज़,
कॉलेज ला गेल्यावर ग्रूप
तूटल्याच कॉंप्रमाइज़,
शिक्षण संपल्यावर
जॉब साठी कॉंप्रमाइज़,
आणि
जॉब वर तर आपल्या
वेळेच कॉंप्रमाइज़,
मोठा झल्यावर आवडी
निवडी च कॉंप्रमाइज़,
सेविंग करायची म्हणून
शॉपिंग च कॉंप्रमाइज़,
कधी घरच्यान साठी
कॉंप्रमाइज़ तर कधी
तीच्या साठी कॉंप्रमाइज़,
आयुष्यात खूप
कॉंप्रमाइज़ केल..
फक्त एकाच ठिकाणी
माना सारख जगायला
मिळाल, हसायला मिळाल..
ते म्हणजे आपले मित्र
-------------------------------------------------
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार
असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
...
नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते.
-------------------------------------------------
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस
कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
-------------------------------------------------
आयुष्यात एक तरी मित्र असावा ..
धुन्ग्नावर लाथ मारणारा ,
बापाच्या नावाने हक मारणारा ,
आणि कधी ''ती '' दिसली तर आपल्या नावाने मोठ्ठ्याने ओरडणारा ,
एक तरी मित्र असावा ,
लेक्चर कायम बंक करणारा ,
चहाला कायम आपल्यालाच खिसा फाडणारा ,
एक तरी मित्र असावा गरजेला धाऊन येणारा ,
आणि हाक मारताना 2 तरी शिव्या देणारा ,
दररोज ," कसा हाईस" विचारणारा ,
पोरीन समोर शिव्या देऊन शिनिंग मारणारा ,
एकतरी मित्र असावा कितीपण "टूल " असला तरी गाडीवरून घरी सोडायला येणारा ,
आणि प्रत्येक नव्या गोष्टीवर ,
"पार्टी कधी " म्हणणारा
भांडण झाले तरी शान भारत विसरणारा ,
मित्र हवा आपल्याला कधीही न विसरणारा .
-------------------------------------------------
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
''फ़ुलपाखरान्च्या'' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा
-------------------------------------------------
आयुष्याची बेरीज खूप वेळा केली
पण
मैत्रीची बेरीज कधी मला जमलीच
नाही
जेव्हा पडताळणी झाली. तेंव्हा समजले कि ,
आठवण सोडून काहीच शिल्लक उरत
नाही------
-------------------------------------------------
आयुष्याचा अर्थच मला
तुझ्या मैत्रीने शिकवला!
तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी
जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
-------------------------------------------------
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय ,
हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून...
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात तेमहत्वाचं असत...!!!!
-------------------------------------------------
आयुष्य म्हणजे
एक संध्याकाळ, 4 मित्र , 4
कप चहा, 1 टेबल ...
आयुष्य म्हणजे , 4
गाड्या,10 मित्र,सुट्टे पैसे
आणि 1 मोकळा रस्ता ...
आयुष्य म्हणजे , 1 मित्राचा
घर, हलका पूस
आणि गप्पा ...
आयुष्य म्हणजे : कॉलेज चे
मित्र , Bunk केलेले
Lec .
तिखट 1 वडापाव आणि
बिल वरून भांडण ...
आयुष्य म्हणजे,फोन
उचाल्यावर
मित्राची शिवी आणि Sorry
बोलल्यावर
आणखी 1 शिवी ...
आयुष्य म्हणजे, 3 वर्ष नंतर
अचानक
जुन्या मित्राचा 1 sms, धुळीत
पडलेला फोटो आणि
डोळ्यातले आलेले अश्रू ...!!
-------------------------------------------------
आयुष्य भर क्षणा क्षणांची संगत
महणजे मैञी
सुखा दुखात एकञ भिजलेलि नाती महणजे मैञी
ठेचकाळुन पडताना सावरणारा हात
म्हणजे मैञी
आधी पासुन आता पर्यंत
शब्द निशब्द अशी
फक्त मैञी ...
-------------------------------------------------
आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
-------------------------------------------------
आपल्या सावली पासुन आपनच शिकाव ,
कधी लहान तर कधी मोठ होउन जगाव ,
शेवटी काय घेउन जाणार आहोत,
म्हणुन मैत्रीच हे सुंदर रोप असंच जपा
-------------------------------------------------
आपली मैत्री
(Just Like Tom & Jerry)
We are Just Like
Tom & Jerry..
मी Tom
तर
तू Jerry
प्रेमाला अपवाद !
भांडणच भारी…
केव्हा संपेल आपली
दुनियादारी…तीच
वागणं म्हणजे…
I''m Dictator..
मागील जन्मी नक्कीच
असेल ती Hitler…! !
घाबरून करायला लागतात
तिचे सगळे rules Follow
पण माझा वेडे पणा,
she won''t Allow
मला म्हणते तू करतोस
मला Irritate पण तुझ्या
शिवाय कोणाला सांगू माझे
secret''s …
माझ्या सोबत जिंकण्यासाठी
नेहमी करते cheats मी हरलो
आहे,
कसं करू तिला beats…
भांडणा शिवाय आम्हाला
काहीच जमत नाही त्याच्या
सोबत माझं केव्हाच पटत नहि,
पण तॊ नसेल तर मला जरा
सुद्धा करमत नाही प्रेम आहे
पण केव्हा दाखवत नाही…
आपली मैत्री isn''t like
Scooby-Doo & shaggy
Not like Donald & Mickey
Not even like Ed Edd n Eddy.
आपली मैत्री इस Like
मी Tom
&
तू Jerry..
-------------------------------------------------
आता असं वाटतं, की मी स्वतःलाच समजून घेऊ शकलो नाही....
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं, कधी वेचुन घेऊ शकलो नाही....
फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....
भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाही....
माझ्या श्वासांची किंमत केलीच नाही कधी कुणी,
आणि माझे निश्वास मी कधी रोखूच शकलो नाही....
माझ्या फुटकळ आसवांना डोळ्यांत सजवताना,
वेदनेला माझ्या मी थोपवूच शकलो नाही....
मृत्यूवरही माझ्या, रडणारे आहेत मोजकेच,
चार हक्काचे जिवलग, मी कधी जमवूच शकलो नाही....
खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही....
-------------------------------------------------
आठवणी असतात सुगंधापरी ह्रदयात जपण्यासाठी,
सूखदु:खाच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी,
आठवणी असतात एकांतात खूप काही बोलण्यासाठी, सारं जग सोबत असतांनाही त्याच्यात हरवून जाण्यासाठी....
आठवणी असतात सखी बनून सोबत राहण्यासाठी, ओलावलेल्या पापण्यांना मायेचा स्पर्श देण्यासाठी...
-------------------------------------------------
आठवण आली कि मन कासावीस होतं
त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं
मन माझं तर वेडच आहे
कसं सावरू ह्या वेड्या मनाला
जे आजून तुझ्यातच रुजलं आहे
तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.
-------------------------------------------------
आजही मला ते सर्व
आठवतयं जणू कालचं सारे
घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात
बसल्यासारखं ||
अजुनही मला आठवतंय
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत
बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो || te athvale maitriche divas
-------------------------------------------------
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...
सूर्याचं कोवळं उन,
हळुवार झोंबणारी थंडी,
अन साखर झोपेत असताना मित्रांचा आलेला msg,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...
सकाळ-सकाळी मित्र-मैत्रिणीची आठवण,
त्यांना पाठवलेला msg,
अन त्यांची प्रतिक्रिया,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...
-------------------------------------------------
असे हदय तयार कर की,
त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार कर की,
ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श कर की,
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री कर की,
त्याचा शेवट कधी होणार नाही.
-------------------------------------------------
असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं,
...आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारं,
...आपल्यातच स्वतःला हरवुन जाणारं,
...असंच असावं कुणीतरी मनातल्या मनात मैञिचं नातं हळुवार जपणारं
-------------------------------------------------
अशीही मैत्री असावी
जिवाला जीव देणारी
मैत्रीकरता त्याग करणारी
मैत्रीचे पावित्र्य राखणारी
मैत्री ही मैत्री असावी
जगण्याचा एक किरण असावी
आशेचा एक किरण असावी
जीवनाची एक दिशा असावी
हि-यापेक्षा मौल्यवान असावी
अशी तुझी माझी मैत्री असावी.
-------------------------------------------------
अफाट बुद्धीचा
गमत्या मुळचा
मित्र आमचा
आहे एक ||
कुठे कधीही
कुणा समोरही
बोले काहीही
जीभ घसरून ||
प्रेम खाण्यावर
साऱ्या डब्यावर
गोड धोडावर
ताव मारणारा ||
लेट येणारा
हळूच पळणारा
झोपा काढणारा
कामावरती ||
त्याचे देणे
असते घेणे
प्रत्येक नाणे
वाजवाजवून||
हा पगार तर
चालू राहणार
सही केल्यावर
घाई कसली ||
लोक येतात
लोक जातात
कामे होतात
आपोआप ||
आपण कशाला
हवे मरायला
चहा प्यायला
जाई सदा ||
त्याला कळली
देही मुरली
कोळून प्यायली
मुन्सीपाल्टी ||
-------------------------------------------------
अफाट पसरलेल्या या जगात,
आपल् म्हणून कोणी असत
सुख दुःख जाणायला
हक्काच माणूस असत ..
भरकटलेल्या पावलांना ,
दिशा देणार
कोणी असत ..
निराश झालेल्या मनाला,
आधार देणार
कोणी असत ..
आपल्यावरच्या त्याच्या या प्रेमालाच "
मैत्री "हे नाव
असत .......
-------------------------------------------------
अगदीच निराळी माझी मैत्री..
निराळा तो मैत्रीचा कट्टा..
रोजच आम्ही भेटतो
आजही तसेच भेटू..
तिथेच भेटू..
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!!
आमचे लेक्चर
वेगळे असतात जरासे..
क्लास आमचे भरतात..
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!!
आम्ही तर पाहतो
सुंदर सुंदर मूलीना..
वाटत ती जॉइन व्हाव
आमच्या ग्रुपमध्ये..
अधाश्या सारख्या नजरा
सतत धावतपळत असतात..
कुणाच्या तरी पाठीमागे..
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!!
प्रेमासाठी मदत म्हणून..
अशी ती आमची मैत्री..
बहिणीसाठी भाउ म्हणून
अशी ती आमची मैत्री..
भांडनात सदैव तयार
अशी ती आमची मैत्री...!!!
कायम एकमेकांसाठी
एकमेकांच्या मनात असलेली
रंगीबेरंगी मैत्री कायम फुलते..
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये...!!!
गोड गुलाबी
प्रीतीच्या फुलासारखी..
पांढर्या शुभ्र फुलासारखी
स्वच्छ अशी आमची ती मैत्री..
आजही फुलते
त्या तिथे
कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये.
-------------------------------------------------
¤ ¤ ¤ तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,
आपल्या मैत्रीच त्याला पाणि घालीन ,
जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!
-------------------------------------------------
"मैत्री" म्हणजे ''संकटाशी'' झुंजणारा ''वारा'' असतो. ''विश्वासाने'' वाहणारा आपुलकीचा ''झरा'' असतो."मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक''बाद'' झाला तरी दुसर्याने ''डाव'' ''सांभाळायचा'' असतो...
-------------------------------------------------
"मैत्री"
प्रत्येकाच्या आयुष्यात
अनेक वळणं येतात...
प्रत्येक वळणावर
अनोळखी नाती जूळतात...
अनोळखी व्यक्ती
आपल्या हक्काच्या होतात...
आयुष्यात येऊन
आयुष्यच बनून जातात...
ही नाती
हसतात, खेळतात,
भांडतात, रूसूनही बसतात...
पण
तरीही एकत्र येतात
जश्या संगमावर नद्या मिळतात...
कितीही दूर असली तरी
मनात आठवण बनून राहतात....
अश्या या प्रेमळ नात्यांनाच
नाव ''मैत्री'' असे म्हणतात...
-------------------------------------------------
"मैञी" आपली मनात जपली ..
कधी सावलित विसावली ..
कधी उन्हात तापली ..
"मैञी" आपली .
कधी फुलात बहरली ..
कधी काट्यात रुतली ..
"मैञी" आपली !!
-------------------------------------------------
"मैञी आपली ह्रदयात
बसली कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली ,
कधी फुलात कधी काट्यात
रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात
जपली.
-------------------------------------------------
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .
-------------------------------------------------
मैत्रीचे हे ऋणानुबंध,
जपाचे आहे जिवलगा ।
सुख दुखाच्या आठवणी,
साठवा चे आहे जिवलगा ।।
अबोला अणि हा रुसवा,
किती सोसू जिवलगा ।
नशिबी आला हा दुरावा,
कळलेच नाही जिवलगा ।
ओढ लागे हया जीवा,
कुठे शोधू जिवलगा ।
काळाने घेरण्या आदि,
भेटशील का जिवलगा ??
-------------------------------------------------
मैत्री "अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी...
-------------------------------------------------
फुला सारखी हसत
राहिलीस .............. तर
मी खुश आहे,
मोकळेपणाने जगत
राहलीस .............. तर
मी खुश आहे,
मी असं नाही म्हणत
कि रोज मला भेट..........
दिवसातून फक्त
एकदा जरी माझी आठवण
काढलीस ............ तर मी खुश
आहे "
-------------------------------------------------
फक्त मैञी ...
आयुष्य भर क्षणा क्षणांची संगत
महणजे मैञी
सुखा दुखात एकञ भिजलेलि नाती महणजे मैञी
ठेचकाळुन पडताना सावरणारा हात
म्हणजे मैञी
आधी पासुन आता पर्यंत
शब्द निशब्द अशी
फक्त मैञी ...
-------------------------------------------------
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Happy Friendship Day
-------------------------------------------------
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..
-------------------------------------------------
मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे...
-------------------------------------------------
मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...
मैत्री अशी होते..!
काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!
-------------------------------------------------
मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच ...........
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच ..........
आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत
वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.....
-------------------------------------------------
मैत्री ...
तिची नी माझी !!
तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी कहाणी आहे !
दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे !
दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !
एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !
खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे ..
-------------------------------------------------
मानसाचं जीवन हे निसर्गासारख असतं,
निसर्गाप्रमाणेच ते चक्र बदलत राहतं.
कधी सुखाचे पावसाळे तर दुःखाचे उन्हाळे असतात,
सुखात जवळ येतात मात्र दुःखात सगळे निघुन जातात.
चक्र कुठलेही असो, मैत्रीच रोपटं एकटच वाढत जातं,
सुखात डौलाने नाचत तर दुःखात मायेची सावली देतं.
पण देव जाणे, ते ही का कधी-कधी उलमडून पडतं,
उलमडून ही ते परत फुटतच जातं, नकळत वाढतच जातं.
जगातून जाताना कुणी काय घेऊन जातं,
मित्र हा जातानाही परिसाप्रमाने आयुष्याच सोनं करून जातो.
जीवनाच्या वाटेवर अशी मैत्री व असा मित्र मिळतो,
यासाठी नशीबचं लागत.
-------------------------------------------------
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!
द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल
हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल
पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!
प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया
प्रेम आहे न दोघात हे
आपल्या नजरेला कळू दे ना
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!
-------------------------------------------------
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी
;;;;
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी.....
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी.....
-------------------------------------------------
५ लाख रु.च्या गाडीत कधी राॅकेल टाकुन चालवता का?
गाडीचं इंजिन ख़राब होइल याची भीती वाटते ना...??
???????
५ लाखाच्या गाडीची इतकी काळजी वाटते मग?
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
?.
???????
तोंडात
????दारू पिताना
?मावा,
?गुटखा,
?तंबाखू टाकताना,
?सिगारेट
ओढताना कधी विचार केलाय ??
???????
आतड्याचं किडनीचं लीवरचं काय होत असेल ??
???????
५? लाखाच्या गाडीच?्
या इंजिन चा इतका विचार करता मग ???करोडो रु.च्या अनमोल शरीराचा पण तितकाच विचार करा ना भाऊ.....?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
दुनिये साठी तुम्ही? एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबा ?साठी तुम्ही संपूर्ण दुनिया आहात.…हे कधीच विसरू नका !!!!
?स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या !! ?
???????
शक्य तेवढ्या मित्रांना हा संदेश पाठवा.. एखादा तरी नक्की विचार करेल.....? Good Morning?
-------------------------------------------------
?#प्रेमाने कधीच पोट भरत नाही,
आणि मैत्रीत कधीच उपाशी मरत नाही.?
-------------------------------------------------
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
-------------------------------------------------
♖_♜_आयुष्यात_?_पोरीवर_
_पुर्ण_?_जीव_लावण्यापेक्षा❣_
_निम्मा_जीव_?_मिञाना_लावा_
_?आयुष्यभर_ते_?_तुमच्या_
_साठी_जीव_?_देतील_♟_
????love u भावांनो??
-------------------------------------------------
आमची मैत्री समजायला वेळ लागेल... पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल...
-------------------------------------------------
आयुष्यात किती तरी
लोकं येतात आणि जातात पण
जे आपले असतात ते
सोबतच राहतात।।।
-------------------------------------------------
?#आयुष्य कितीही तिखट गोड कडु तुरट असले तरी माझी माणसं खुप गोड़ आहेत...
-------------------------------------------------
तशी नाती तर खूप असतात.. परंतू काहीच अशी असतात की, जी मनाच्या शिंपल्यात सतत मोती बनून राहतात... पिँपळाच्या पानासारखी काही माणसे असतात की, जी मनाच्या पुस्तकात सतत जपून ठेवावीशी वाटतात.।।।।
-------------------------------------------------
?मैञी आपली मनात जपली. कधी सावलित विसावली. कधी उन्हात तापली. मैञी आपली.कधी फुलात बहरली. कधी काट्यात रुतली.मैञी आपली
-------------------------------------------------
??शब्दापेक्षा सोबतीचं? सामर्थ्य ??जास्त असत, मैत्रीच ?खर समाधान ?खांद्यावरच्या? हातात असतं???
-------------------------------------------------
नफरत को हम प्यार देते है .....
प्यार पे खुशियाँ वार देते है ...
बहुत सोच समझकर हमसे कोई वादा करना..
ऐ दोस्त हम वादे पर जिदंगी गुजार देते है
-------------------------------------------------
आज काल जळ नारे भरपूर झालेत त्याना जळू दया....
मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया.....
-------------------------------------------------
काही couples ?असतात जे breakup नंतर ही best_frnd? बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत ?राहण जास्त important असत.....!!!
-------------------------------------------------
आरसा आणि हृदय दोन्ही तसे सारखेच असतात पण आरश्यात सगळे दिसतात आणि हृदयात फ़क्त आपलेच दिसतात
-------------------------------------------------
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणस सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्शा खुप जवळची असतात
-------------------------------------------------
सागरामधील शिंपल्यातहि *एक मोती* असतो,
जो सहज कोणालाही मिळत नसतो,
तशीच हि *मैत्री असते* जी जीवनात सगळ्यांच्याच येते पण, तिची #ओढ सगळ्यानाच नसते.......
-------------------------------------------------
*😊हळूहळू वय निघून जातं...*
*जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.*
*कधी कुणाची आठवण खूप सतावते.*
*कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.*
*पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत...*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो.*
*पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत...*😊
-------------------------------------------------
You May Also Like :-
So these are the Big Collection of Friendship Status MarathiMarathi
Status for insta. fb or Whatsapp.In these Collection Contain a Love Marathi
Status and Attitude Funny Status in One Line.Whatsapp Marathi Status is
additionally accessible Sad Status etc.You can visit above given connection and
Check alternate Status accumulation also.I trust Your Friends Will like these
status gathering of Marathi.Share this Friendship Status Marathi post
Friends on fb.
Tags : friendship status in marathi font marathi friendship sms marathi dosti whatsapp status friendship status in marathi attitude marathi friendship shayari marathi status marathi status on life dosti status in marathi attitude
No comments:
Post a Comment